मोठी बातमी : जालन्यात महायुतीमधील शिंदे गटाचे पदाधिकारी नाराज, अर्जुन खोतकरांनी थेट सांगून टाकले...
Aima news Riyaz Shah
जालना : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर होताच राजकीय पक्षातील नेत्यांमधील नाराजीनाट्य रंगताना पाहायला मिळत आहे. ठाकरेगटातील खैरे-दानवे नाराजीनाट्याची चर्चा सुरु असतानाच आता मराठवाड्यातील (Marathwada) महत्वाचे नेते आणि शिंदे गटाचे माजी आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचे समर्थक देखील नाराज असल्याचे समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी थेट पत्रकार परिषेदतच कार्यकर्त्यांची नाराजी बोलून दाखवली असल्याने चर्चेला उधाण आले आहे. तर, “याबात आपण योग्य ठिकाणी आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे' देखील खोतकर म्हणाले आहेत.