सोलापूरचा अष्टपैलू खेळाडू आर्शिन कुलकर्णी
आयपीएल साठी रवाना
सोलापूर मधील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अतुल कुलकर्णी यांचे सुपुत्र , अष्टपैलू क्रिकेट खेळाडू अर्शिन कुलकर्णी याची लखनौ जायंटस आयपीएल संघात निवड झाली आहे.या स्पर्धेसाठी नुकताच तो रवाना झाला आहे.भविष्यात देशासाठी हार्दिक पांड्या सारखा एक अष्टपैलू खेळाडू घडेल अशा सर्व सोलापूर वासियांना त्याच्या कडून अपेक्षा आहेत.या पूर्वी देश विदेशातील अनेक स्पर्धा मध्ये त्याने यशस्वी कामगिरी केली आहे.स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी सोलापूर क्रिकेट असोसेशन तर्फे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.