logo

चांदवड शहरात मासाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा*

*चांदवड शहरात मासाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा*

छत्रपती शिवाजी महाराजा नंतर रयतेसाठीचे राज्य जर कोणी केले असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी. याच अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने आणि सहवासाने पावन झालेली भूमी म्हणजे चांदवड. चांदवड येथे होळकरशाहीची दख्खनेतील उपराजधानी होती. या चांदवड शहरात एक टोलेजंग होळकरांचा राजवाडा तर आहेच. शिवाय मल्हारराव होळकर यांच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ताब्यात सातमाळा पर्वत रांगेतील पाच सहा किल्लेही होती. शिवाय महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले रेणुकामातेचे मंदिराचाही जिर्णोद्धार चांदवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून झाला. चांदवड येथे एक तलावही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्याकाळी केला. या ठिकाणी 2मजीद आई साहेबांनी बांधले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि चांदवड भूमीचा गौरवशाली इतिहास असताना सुद्धा या मातेचे एखादे स्मारक या भूमीत नसावे, हे आतापर्यंत इतिहासाच्या दृष्टीने दुर्दैवी होते.
ही अनेकांच्या मनात खंत सलत होती. मात्र आज दिनांक 15मार्च 2024 रोजी काही इतिहास प्रेमींनी पुढे येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा हा या शहराच्या मुख्य रस्त्यावर बसवण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला.
ज्यांच्या मनात ही कल्पना आली आणि त्यांनी अतिशय प्रांजळपणाने ही कल्पना राबवली. या सर्व शिवमल्हार मावळ्यांना मानाचा मुजरा.
आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नवीन पुतळ्या समोर नतमस्तक.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻 एक इतिहास प्रेमी.🙏🏻

2
25 views