logo

मुख्यमंत्र्याच्या दालनाच्या पाटीवर आले आईचे नाव

सोलापूर १४ मार्च
महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच वडिलांच्या नावा सोबत आईचे नाव लिहिण्याचा निर्णय बंधनकारक घेतला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर स्वतःच्या दालना बाहेर एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे अशी पाटी लावली आहे.याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्री यांनी सुधा आपल्या दालना बाहेर आईचे नाव असलेली पाटी लावली आहे.या पुढे राज्यात सर्व शासकीय नोंदीत आईचे नाव लिहिणे बंधनकारक असणार आहे.१मे २०२४ पासून जमलेल्या बालकाची नोंदणी प्रथम बालकांचे नाव नंतर आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व शेवटी आडनाव असणार आहे.
माणसाची जडण घडण करण्यात वडिलांबरोबर आईचे पण तितकेच श्रेय असते.बालकाच्या जन्मापासून ती अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असते,तिला तिच्या कामाचे श्रेय या निर्णय मुळे मिळणार आहे.या शासनाच्या निर्णय मुळे आई चा मानसन्मान नक्कीच वाढेल.

0
0 views