माजी नगरसेवक विठ्ठल गुळघाणे यांनी हातात घेतली शिवसेची मशाल..!! विठ्ठल गुळघाणे यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात होणार मोठा फायदा
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीसाठी सर्वात महत्वाचा असलेल्या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष माजी नगर सेवक विठ्ठल गुळघाने यांनी नगाडा सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून आपल्या हाती मशाल घेतली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष विठ्ठल गुळघाणे यांचा शिवसेना उबाठामध्ये पक्ष प्रवेश झाला आहे.त्यांनी शिवसेना उबाठा चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष,माजी नगरसेवक तसेच श्वास सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गूळघाणे यांचा हा पक्ष प्रवेश यवतमाळ येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेण्यात आला. विठ्ठल गुळघाने यांच्या या पक्षप्रवेशानंतर शिवसेनाची मशाल खऱ्या अर्थाने हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात बळकट होणार असल्याची चर्चा आहे. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील बरेच वर्षा पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे वजन असून शिवसेनेची मशालहि मजबुत झाली असून विधानसभा क्षेत्रामध्ये प्राबल्य तयार झाले आहे. विठ्ठल गुळघाणे यांनी या पक्षातून काढता पाय घेत शिवसेना उभाठामध्ये प्रवेश केला आहे.विठ्ठल गुळघाने यांनी शिवसेनेची मशाल हाती घेतल्याने हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात मशाल अजून मजबूत झाली आहे,येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार राहणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची ची मशालीची ज्योत घरोघरी पोहोचवण्यासाठी तयार आहे. या पक्षप्रवेशानंतर महाविकास आघाडीला व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला हिंगणघाट विधानसभा मतदारसंघांमध्ये फायदा झाला आहे.