
पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या
शेख सकलैन आयमा न्युज बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून कारकीर्द गाजविणाऱ्या सुभाष दुधाळ यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज दि.९ मार्च रोजी परळी येथे उघडकीस आली. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. आज दिनांक ९ मार्चला सकाळी त्यांचा मृतदेह रेल्वे लाईनवर आढळला. रात्री त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे. कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक म्हणून सुभाष दुधाळ यांची ओळख होती. ते ४२ वर्षाचे होते.
बुलढाणा जिल्ह्यात रायपुर पोलीस स्टेशनचे ठाणे म्हणून त्यांच्या कारके कारकीर्दी कारकीर्द उल्लेखनीयआहे. दरम्यान रायपूर वरून बदली झाल्यावर त्यांच्यावर बुलढाणा सायबर क्राईम विभागाचे जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या टीमने अनेक क्लिष्ट अशा गुन्ह्याची उकलई केली होती हे विशेष.
भरापूर्वी सुभाष दुधाळ यांची बीड येथे बदली झाली होती. नुकतीच बीडमधून त्यांची पुण्यातील सीआयडी भागात बदलली करण्यात आली होती आता त्यांचा मृतदेहच आढळून आल्याने एकच खबर उडाली आहे. पुण्यातून ते परळी कशासाठी आले होते, हे करू शकले नाही. सुभाष दुधाळ यांच्या शरीराचे दोन तुकडे झालेले आहेत. दुधाळ यांच्या मृतदेह शेजारी चिठ्ठी सुद्धा सापडली असून पुढील तपास परळी पोलीस स्टेशन करीत आहे.