मुंबई ते विजापूर गाडी लवकरात लवकर चालू करावी अशी समस्त कुर्डूवाडीकरांची मागणी.
कुर्डूवाडी:- मुंबईतील विजापूर गाडी ही अल्प कालावधीसाठी बंद करण्यात आले होते पण ती गाडी आता चालू करण्याबाबत रेल्वे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसून कुर्डूवाडी मधील प्रवाशांची गैरसोय होत असल्याबाबत तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार देऊन हे रेल्वे प्रशासनाला अद्यापपर्यंत जाग आलेली दिसत नाही सोलापूर ला जाण्यासाठी सात नंतर कुठलीही गाडी नाही यासाठी रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर मुंबई ते विजापूर गाडी चालू करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.