logo

इरा शाळेत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम... महिलांचा सन्मान सोहळा...

जिल्हा/नंदुरबार
खापर
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अक्कलकुवा तालुक्यातील खापरच्या इरा इंटरनॅशनल स्कुलने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.महिला दिनानिमित्त प्रामुख्याने महिलांचा गौरव;तसेच महिला सशक्तीकरणावर भर देण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संचालक शांताबाई सोनार यांच्या हस्ते भारतमाते,देवमोगरा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
अक्कलकुवा तालुक्यातील अनेक कर्तृत्ववान महिला आहेत ज्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात कार्यरत आहे.तर अनेक महिला लहानमोठ्या कामातून तालुक्यात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.अशा महिलांना त्यांच्या कामांचे कौतुक त्यांचा सत्कार करून द्यावा,संस्था अध्यक्ष योगेश सोनार यांच्या संकल्पनेतून इरा शाळेच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी इरा शाळेचे अध्यक्ष योगेश सोनार,मुख्याध्यापक निलेश पाटील आदीं होते.सूत्रसंचालन प्रिती घंटे व मिलन शुक्ला यांनी केले तर आभार उषा मराठे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

गुणवंत महिलांचा सत्कार....
डॉ.प्रियंका जैन,अँड.कल्पना लोहार,पोलीस कल्पना वसावे,शिक्षिका दिवाली ठाकरे,अनामिक ठाकरे,आशा पटेल,प्रियंका बागल,स्वाती चव्हाण,अर्चना पाटील,मनिषा चौधरी,अश्विनी पाटील,सोनल महाजन,शिल्पा नाईक,वर्षा वळवी,वनपाल संगिता पाटील,आ.सेविका गायत्री अभणे,रंजिता वसावे,ब.गट संचालिका पूनम जगताप,अंगणवाडी सेविका निर्मला मराठे,व्यवसायिका अंजना चौबे,सपना जैन,निकिता सोनी,पूनम जैन,शितल खोंडे,कौशल्या पाडवी,समाजसेविका प्रियंका अग्रवाल,मोहिनी सोनार,केंद्र प्रमुख माधुरी सुर्यवंशी,गायिका प्रज्ञा जाधव,इरा शाळेचे संचालक प्रियंका सोनार,महिला महाविद्यालय अक्कलकुवा प्राचार्य ज्योति लष्करी,कोतवाल पल्लवी नाईक,अधिक्षीका रोशनी चाहदें,विस्तार अधिकारी आरती शिंपी,सोरापाडा सरपंच अंजू पाडवी.

फोटो⤵️
खापर येथील इरा शाळेत महिला दिनानिमित्त सत्कार कार्यक्रमात उपस्थित अक्कलकुवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवर महिला.

43
8550 views