logo

सिपोरा अंभोरा येथील ज्ञानसागर विद्यालयास पुस्तक संच भेट जाफराबाद शहर प्रतिनिधी : आकाश बकाल जाफराबाद : शिक्षक आमद

सिपोरा अंभोरा येथील ज्ञानसागर विद्यालयास पुस्तक संच भेट

जाफराबाद शहर प्रतिनिधी : आकाश बकाल

जाफराबाद : शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या वतीने ६ मार्च रोजी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा व पुस्तक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार विकास निधीतून जिल्ह्यातील सर्व अनुदानित शाळांना पुस्तक संच वितरण करण्यात आले. जाफराबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा येथील ज्ञानसागर विद्यालयास ३२ हजार रुपये किमतीच्या तीनशे पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीणा, शिक्षणाधिकारी मंगल धुपे, भास्कर दानवे आदी उपस्थित होते.

0
229 views