logo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहर जिल्हा चे नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या वतीने सर्व सेल च्या प्रमुखांचे बैठकीचे आयोजन....

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष श्री. सुधीर खरटमल यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच पक्षातील सर्व सेल च्या प्रमुखांची बैठक आयोजित करून सर्वांच्या कामाचा आढावा घेतला.
बैठकीच्या सुरवातीला श्री. सुधीर खरटमल यांनी सर्व उपस्थिततांचे गुलाबचे फुल देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश युवक उपाध्यक्ष श्री प्रशांत बाबर होते. यावेळी सर्व सेल च्या अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची ओळख करून घेण्यात आली. नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी सर्व सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रत्येक प्रभागात भेटीगाठी देऊन जनतेचे कामे करणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील प्रभागात जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करून जनतेचे काम करावेत व शरदचंद्र पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोचण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करू व पक्ष वाढवण्याकरिता लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्वच सेल च्या अध्यक्षांनी आपले म्हणणे सविस्तर पणे मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रशांत बाबर म्हणले की श्री. सुधीर खरटमल अध्यक्षस्थानी विराजमान झाल्यापासून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी विशेषता तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सगळेच पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागले आहेत. ते पुढे म्हणाले की नूतन अध्यक्ष खूप अनुभवी असून त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच पक्षातील इतर सर्वांना होणार आहे. यावेळी महिला अध्यक्षा सौ. सुनीता रोटे, युवक अध्यक्ष अक्षय वाकसे, कार्याध्यक्ष सरफराज शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष वारिस कुडले, एजाज शेख सर, जनरल सेक्रेटरी श्री. चंद्रकांत पवार, डॉ. दादाराव रोटे, युवक अध्यक्ष श्री. अक्षय वाकसे, व्ही.जी.एन. टी सेल चे अध्यक्ष मोहम्मद इंडीकर, कार्याध्यक्ष अक्षय जाधव, युवती शहराध्यक्ष डॉ. प्रतीक्षा चव्हाण, कार्याध्यक्ष सुप्रिया लोमटे, उपाध्यक्ष अंकिता रायकर, सोशल मिडिया प्रभारी अध्यक्ष लाडजी नदाफ, मल्हार शिंदे, कामगार सेल चे अध्यक्ष डॉ. गोवर्धन सुंचू, झोपडपट्टी सेल चे अध्यक्ष लक्ष्मण भोसले, कार्याध्यक्ष अॅड. मोहन कुरापाटी, उद्योग व व्यापार सेलचे अध्यक्ष संपन्न दिवाकर, विशाल सावंत, मन्सूर शेख, सामाजिक न्याय विभाग सेलचे अध्यक्ष अजित पात्रे, विद्यार्थी सेल चे अध्यक्ष निशांत सावळे, कार्याध्यक्ष समर्थ लवटे, सोहेल सुभेदार, शहर उत्तर अध्यक्ष साबीर कुर्ले, सचिव फिरोज शेख, प्रवीण वाडे, रामप्रसाद शागालोलू, शक्ती कटकधोंड, मोनिका सरकार, प्रा. राहुल बोळकोटे उपस्थित होते.

0
0 views