
*शैक्षणिक संस्थाचालक शेख निसार अहेमद गफार याने केला महिला मुख्याध्यापिकेचा विनयभंग !*
*शैक्षणिक संस्थाचालक शेख निसार अहेमद गफार याने केला महिला मुख्याध्यापिकेचा विनयभंग !*
( लोकाधिकार प्रतिनिधी )
लातूर :- लातूर तालुक्यातील बोरी येथील मियाॅंसाब शैक्षणिक व सेवाभावी संस्था संचलित कमला नेहरू प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिकेचा संस्थेचा उपाध्यक्ष असलेल्या व शिरूर आनंतपाळ तालुक्यातील मौजे कांबळगा येथील याच संस्थेच्या साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून मुख्याध्यापक व प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या निसार शेख यानी हा विनयभंग केला आहे.
लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कमला नेहरू प्राथमिक शाळा बोरी येथील मुख्याध्यापिका श्रीमती बसेरिया बेगम फारूकमिया इनामदार यांनी विनयभंग करणारा शेख निसार अहेमद गफार याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
श्रीमती इनामदार यांनी दिलेली तक्रारीनुसार दिनांक ५ मार्च २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता श्रीमती इनामदार मॅडम शाळेमध्ये येऊन शाळेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी ऑफिसमध्ये बसलेले असताना सकाळी ९ वाजता शाळेचे काही शिक्षक हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करण्यासाठी आले. तेवढ्यात संस्थेचे उपाध्यक्ष असलेले शेख निसार अहेमद गफार हे तेथे आले व तुम्ही माझ्या पुतणीची गैरहजेरी का टाकता असे म्हणून वाईट हेतूने इनामदार मॅडम यांचा उजवा हात धरून व त्यांच्या हातातील हजेरीपट घेऊन धक्का मारून ढकलून दिले. त्यावेळी इनामदार मॅडम यांनी मी शासनाचा पगार घेते आणि नियमाप्रमाणे काम करते. तुमची पुतणी समीना पटेल ही शिक्षिका असून शाळेतच येत नाही. म्हणून मी तिची गैरहजरी टाकत आहे, असे म्हणाले असता शेख निसार अहेमद गफार यांनी इनामदार मॅडम यांना, तू इथून पुढे माझ्या पुतणीची अपसेंटी टाकून तर बघ मी तुला दाखवतो अशा भाषेत दमदाटी करून शिवीगाळ केली. तसेच तुला नियमीत कशी नौकरी करायची ते दाखवतो. आमचे संस्थेने नोकरी दिली आहे, तेव्हा तू आमचच ऐकलं पाहिजे. नाही तर तू बोरी गावात येऊन कशी नौकरी करतेस तुला आता बघूनच घेतो, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
त्यावेळी शाळेतील काही शिक्षक, सेवक, खिचडी शिजवणारे कर्मचारी पण तेथे हजर होते. यापूर्वीही शेख निसार अहेमद गफार यांनी अशाच प्रकारे त्रास दिला असल्याचेही इनामदार मॅडम यांनी तक्रारी अर्जात म्हटलेले आहे.
सदर तक्रारीवरून लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये शेख निसार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर ५९/२०२४ असा आहे. भारतीय दंड संहिता कलम ३५४, ३२३, ५०४, ५०६ नुसार सदरचा विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना ज्या संस्थेत घडली आहे, ते संस्थाचालक आणि संस्थेचे अध्यक्ष जब्बार गफूर सगरे हे काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.
काँग्रेसचा पुढारी असलेल्या संस्थाचालकाच्या शाळेतील मुख्याध्यापिकेचा विनयभंग करणारा सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्राचार्य हा तर संस्थाचालक जब्बार गफूर सगरे यांचा सख्खा भाऊ आहे.