विविध कार्यकारी सहकारी संस्था,झरी ता.निलंगा येथील चेअरमपदी शुभम बाबुराव पाटील यांची वयाच्या 28 व्या वर्षी बिनविरोध निवड करण्यात आली.
विविध कार्यकारी सहकारी संस्था,झरी ता.निलंगा येथील चेअरमपदी शुभम बाबुराव पाटील यांची वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.लातूर जिल्ह्यातील सहकारी संस्थेमध्ये सर्वात कमी वयाचे तरुण चेअरमन म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.तसेच व्हा.चेअरमन म्हणून श्री.प्रभाकर मुकुंद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.सर्व गावकरी यांच्या कडून त्यांचा सन्मान करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या