पांडवानी स्थापीत केले भुलेश्वरी येथील शिवलिंग पथ्रोट ः महाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोक
पांडवानी स्थापीत केले भुलेश्वरी येथील शिवलिंगपथ्रोट ःमहाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस असतो असे मानले जाते. शिवरात्रीच्या एका प्रहरी शिव विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हटले जाते. महाशिवरात्री पर्वाच्या निमीत्ताने पथ्रोट नजीकच्या भुलेश्वरी येथील महादेवाचे मंदीर भव्य सजले असुन पाडव्यापर्यत मोठी यात्रा भरणार आहे.भुलेश्वरी येथील शिवलिंग महाभारत काळात पांडव अज्ञातवासात असताना स्थापन केले. आख्यायीकानुसार पांडव अज्ञातवासात असताना कुणबी वाघोली नजीकच्या जंगलात विसरले असता त्यानी भुलेश्वरी नजीकाठावर शिवलिंगाची स्थापना केली. पुर्वी महादेवाचे मंदीर सध्या हयात असलेल्या धरणक्षेत्रात होते. धरण निर्मीती नंतर शिवभक्तानी धरणक्षेत्राच्या बाहेर निर्माण केले. महाशिवरात्रीच्या काळात आदिवासी भक्तासह अंजनगाव, दर्यापुर, अचलपुर, अकोट तालुक्यातील शिवभक्तांची मांदीयाळी असते. मोठ्या संख्येने पथ्रोट येथील भुलेश्वरी यात्रा समीती साबुदाण्याची उसळ वाटतात. आर्य समाज पथ्रोटचे प्रधान शरदराव कोसरे दरवर्षी शतकुंडीय महायज्ञाचे आयोजन करतात.दरवर्षी मरापम मंडळाचे परतवाडा आगारातुन यात्रेकरु करीता बस सोडत असे मात्र काही वर्षापासुन बसेस नसल्याने प्रवासी भक्त खाजगी वाहनाने प्रवास करतात. आगार प्रमुख जिवन वानखडे परतवाडा याना विचारणा केली असता सालबर्डी येथे बसेस पाठवत असुन शक्य झाल्यास बसेसची व्यवस्था करतो असे सांगीतले.