
*अंतुर्ली येथील 10वीच्या 1991 बॅचचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न*
*अंतुर्ली येथील 10वीच्या 1991 बॅचचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न*
अंतुर्ली येथील मिठाराम फकीरा तराळ विद्यालयाच्या इयत्ता 10वीच्या 1991 बॅचचे स्नेहसंमेलन मध्यप्रदेश राज्यातील बुरहानपुर येथील मन रिसॉर्ट हॉटेल मध्ये स्नेहसंमेलन संपन्न झाले .10वीच्या 1991 बॅचचे सर्व मित्र मैत्रिणी 33 वर्षांनी एकत्र आले एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला .या स्नेहसंमेलनात मुला व मुलींच्या परिवाराला सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते हा स्नेहसंमेलन कार्यक्रम सकाळी 9ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होता .यावेळी सर्वांनी आपल्या परिवाराची माहिती व आपण करत असलेला व्यवसाय ,नोकरी याविषयी माहिती दिली .प्रत्येकाने आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या यावेळी स्नेहसंमेलनात काहींनी गाणे म्हटले ,डान्स केला, खेळ खेळले .या स्नेहसंमेलनाच्या शेवटी सर्वांचे मन भरून आले यावेळी आपण पुन्हा असेच भेटत राहू असे सर्वांनी सांगितले प्रत्येकाच्या सुख दुःखात भेटू असे सुद्धा सांगितले .जे मित्र मैत्रिणी या स्नेहसंमेलनाला हजर नव्हते अशांसाठी पुढील वर्षी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करू असे सर्वांनी सांगितले व आपल्या भावना व्यक्त केल्या .या स्नेहसंमेलनाच्या दिवशी संपूर्ण दिवस मित्र मैत्रिणीच्या आठवणीने कुठे गेला समजलच नाही अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले या स्नेहसंमेलनात भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
*किरण पाटील मुक्ताईनगर*