फायनान्स कंपनी समवेत पोलिसांनी कर्जदाराच्या मुलाला मारहाण केली.
मानाजी नगर नऱ्य्हे पुणे येथील एका 20 वर्षे वयाच्या मुलाला बजाज फायनान्स हफ्ते वसुली करण्यासाठी आलेल्या व्यक्ती नी आणि काही अभिरुची पोलिस स्टेशन मधील अधिकारी यांनी या गरिब मुलाला मारहाण केली आहे. बजाज फायनान्स चे कर्ज त्या मुलाच्या वडिलांनी घेतले होते. परंतु त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने ते त्यांच्या मुळ गावी घेले होते. आणि त्या दुःखदायक घटनेमुळे त्यांचे फायनान्स चे दोन हफ्ते लेट झाले. त्यांना ते हफ्ते भरता आले नाहीत. हि घटना फायनान्स कंपनी वाल्यांनी समजून घेतले नाही आणि पोलिस लोकांनी गरिबांची मदत करण्याऐवजी त्या कर्ज दाराच्या मुलाला मारहाण केली आहे. त्यामुळे तो मुलाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मुलाच्या मित्रांने त्याला वाचविले तो मुलगा पूणे येथील ससून रुग्णालयात उपचार घेत आहे.