logo

मराठा आंदोलन

सकल मराठा समाज जाधववाडी चिखली च्या वतीने श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर व त्याचबरोबर जाधवाडी परिसरामध्ये मराठा समाजाच्या वतीने ढोल ताशे, फटाक्याच्या आतिषबाजीत व डीजे लावून जंगी मिरवणूक काढण्यात आली!

यावेळी परिसरातील सकल मराठा समाज बहुसंख्येने उपस्थित होता!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या मिरवणुकीला सुरुवात झाली! जाधववाडी मातोश्री कमान, आहेरवाडी चौक, मधला पेठा, शिव रोड, रामायण मैदान या मार्गाने सकल मराठा समाजाच्या वतीने मिरवणुक काढण्यात आली! त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन व सकल मराठा समाजाच्या वतीने पेढे वाटप करून या विजयाचा जल्लोष करुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला!

त्याचबरोबर खराडी वाघोली येथील मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलन मार्गातील मुक्कामाच्या ठिकाणी सकल मराठा समाज जाधववाडी च्या वतीने पाच हजार लोकांना अन्नाचे वाटप करण्यात आले!त्यावेळेसही मराठा समाजाने उत्स्फूर्तरीत्या साहित्य गोळा करून आपला सहभाग नोंदवला!

यावेळी शरद चोबे,किरण सांळुखे,आकाश जरे, रवींद्र लंके,नवनाथ कदम,राहुल गरड,अनिकेत वाळके,सुमीत खोसे, प्रदीप खट,दत्ता ढोबळे,भारत नरवडे, नितीन काशीद,भरत कान्हूरकर, संतोष चव्हाण, संतोष पवार, रोहन चव्हाण,अक्षय खोजे,निलेश पाटील,अमर आरडकर, विकास सगळे,दत्ता जगताप, किरण उडाणे, विशाल उबाळे,अक्षय बगाटे, परशुराम उकिरडे, शुभम सूर्यवंशी,सुहास शेळके, योगेश राहणे, श्रीराम गादेकर,सुरेश तळेकर,संपत घोगरे,रवि धावने,सुनील थिगळे इ. इत्यादींनी संयोजन केले!

40
236 views