logo

अवघ्या३८ मिनिट १४ सेकंदात कळसुबाई शिखर केले सर!

अवघ्या३८ मिनिट १४ सेकंदात कळसुबाई शिखर केले सर!


प्रतिनिधी

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसुबाई शिखराची चढाई गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी अवघ्या ३८ मिनिट १४ सेकंदात करून एका नव्या विक्रमाला गवसणी गवसणी घातली आहे.
कळसूबाई शिखर समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर उंचीवर आहे. पायथ्याशी असणाऱ्या बारी गावातून शिखरांची ऊंची सुमारे ९०० मीटर आहे. येथील कठीण कातळ टप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे शिखर चढाईसाठी गिर्यारोहकांना सर्वसाधारण २ ते ३ तासांचा अवधी लागतो. तानाजी केकरे महाराष्ट्र रेंजर्स संस्थेचा प्रमुख गिर्यारोहक आहे.
राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून १२ जानेवारी रोजी हा उपक्रम राबवण्यात आला. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत उभ्या ठाकलेल्या या शिखराची चढाई म्हणजे भल्या भल्या गिर्यारोहकांची दमछाक होते. त्याच्या चढाईची आखणी गिर्यारोहण क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र रेंजर्स संस्थेने केली. तानाजी व टीमने आदल्या दिवशी बारी या गावी मुक्काम केला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच चढाईची तयारी केली. रोजचा सराव व प्रचंड मेहनतीच्या जोरावर तानाजीने हे शिखर विक्रमी वेळेत सर केले
विक्रम मोडला.
यापूर्वीचा विक्रम बारी येथील गिर्यारोहक साजन भांगरे यांच्या नावावर आहे. त्यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये कळसुबाई शिखर ४२ मिनिटामध्ये सर केल्याची नोंद आहे.

यापूर्वीही केली कठीण सुळक्यांवर यशस्वीपणे चढाई..
तानाजी केकरे गिर्यारोहण क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व असून त्यांनी बेसिक तसेच ऍडव्हान्स रॉक क्लाइंबिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यात सुवर्णपदक प्राप्त केले आहेत. एक अनुभवी ट्रेक गाईड म्हणून देखील कार्यरत आहेत. याआधी लिंगाना हा अवघड श्रेणीतील सुळका ११ मिनिटे २२ सेकंदात तसेच अलंग मदन कुलंग हे दुर्गत्रिकुट ३ तास १२ मिनिटात सर करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. तानाजी यांनी याआधी वजीर, वानरलिंगी, कळकराई, तैलबैला यासारख्या अत्यंत कठीण अशा सुळक्यांवर यशस्वीरीत्या चढाई केली आहे.

90
5855 views