हजरत पंचपीर बाबा दग्र्याचे सौंदर्गीकरण करा मुस्लीम समाजाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हजरत पंचवीर बाबा यांची दर्गा तसेच मुस्लिम कब्रस्तानात रस्ते लाईट व इतर सौंदयोंकरण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा येथील छोटू हित्तू गवळीसह मुस्लिम बांधवांनी दिला आहे.
मुख्याधिकारी, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, शहरातील पोलिस स्टेशनच्या बाजूला असलेल्या मुस्लिम कब्रस्तान व दर्गा परिसरात सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून वॉल कंपाऊंड, गेट, स्ट्रीट लाईट, टावर
पेवर ब्लॉक आधी कामे होणार आहे. मात्र निधीतून काही कामे अर्धवट झाली असून इतर कामे राहिलेली आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी होत आहेत. मंजूर झालेली कामे पूर्ण करण्यात यावी. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याचे आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सदर कामे २० जानेवारीच्या आत सुरू करावी, अन्यथा नगरपरिषद समोर आंदोलन करण्याच्या गंभीर इशारा छोटू गवळी, आरिफ शाह, अख्तर सौदागर, रफिक गवळी, मुकीम कुरेशी, इमाम गवळी, जमील अहमद, जागीरदार, हसन भिका गवळी आदींनी दिला आहे.