logo

७ वे राज्यस्तरीय आदिवासी युवा सांस्कृतिक संमेलन जव्हार मध्ये संपन्न.*

भारतीतील विविध राज्ये व महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्र असलेल्या भागात सद्य परिस्थितीत
जातीयवाद, प्रांतवाद, वर्णभेदवाद, धार्मिकवाद, क्षेत्रवाद (पेसा-नॉन पेसा) इत्यादी गोष्टींवर वाद निर्माण करुन मोठे संकट उभे होत आहे. यावर देश व राज्यातील विविध आदिवासी संघटनाद्वारे एकता, बंधुत्व, अस्मिता, पर्यावरण, संवर्धन, संस्कृती-परंपरा याबाबींवर अस्तित्वाची लढाई लढत आहे. परंतु विकासाच्या नावाने आदिवासी बहुल भागात अनेक प्रकारचे मोठे विघातक प्रकल्प, कंपन्या, बोगदे, बंदरे करिता जमिनींचे हस्तांतरण चालू आहे. तसेच स्थलांतर, आरोग्याच्या समस्या, मजुरांचे शोषन, महिलांवरील होणारे अत्याचार, बेरोजगारी, व्यसनधीनता, शैक्षणिक समस्या, आरक्षणातील घुसखोरी, डी-लिस्टींग अशा अनेक समस्या निर्माण होत असुन यावर आता वैचारीक लढाई करिता एकत्रित येवुन दिशा ठरविण्याची गरज आहे.

या वैचारिक आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी युवक सहभागी होत असुन युवकांमध्ये नवचैतन्य, प्रेरणा व आदिवासी विचारधारा निर्माण करण्याच्या उद्देशाने गेल्या १०-१२ वर्षापासुन सातत्याने संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना द्वारे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यात "राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक युवा संमेलन" आयोजित करित आहे. या वर्षीचे युवा संमेलन २९ व ३० डिसेंबर २०२३ रोजी जव्हार, ता. जव्हार, जि. पालघर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते .

9
431 views