logo

निमंत्रण नसल्याचा दावा, राम मंदिराच्या मुख्य पूजाऱ्यांच उद्धव ठाकरेंना उत्तर https://www.garjahindustan.in/politics/ram-temple-ram-mandir

निमंत्रण नसल्याचा दावा, राम मंदिराच्या मुख्य पूजाऱ्यांच उद्धव ठाकरेंना उत्तर

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या मुद्यावरुन सध्या राजकारण रंगलं आहे. या सोहळ्याच निमंत्रण कोणा-कोणाला दिलय? कोणाला निमंत्रण नाही? यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता श्री राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पूजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी निमंत्रणाच्या मुद्यावर उत्तर दिलय.

अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी सुरु आहे. मंदिर उभारणीच काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या 22 जानेवारील अयोध्येत राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्याच निमंत्रण कोणा-कोणाला दिलय? कोण-कोण येणार? कोणाला निमंत्रण नाही? यावरुन राजकारण रंगल आहे. अलीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच निमंत्रण मिळाल नसल्याच दावा केला होता. त्यावर श्री राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पूजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी उत्तर दिलय. “22 जानेवारीला भव्य प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. राम भक्तांना त्याच निमंत्रण देण्यात आलय असं आचार्य सत्येंद्र दास म्हणाले.

भगवान रामाच्या भक्तांनाच निमंत्रण देण्यात आलयभाजपा भगवान रामाच्या नावावरुन राजकारण करतय असं म्हणण चुकीच आहेआपल्या पंतप्रधानांचा सर्वत्र आदर आहेआपल्या कार्यकाळात त्यांनी प्रचंड काम केलयहा राजकारणाचा विषय नाहीही त्यांची भक्ती आहे” असं मुख्य पूजारी म्हणाले.

उद्घाटनाचा कार्यक्रम राजकीय कार्यक्रम बनू नये

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच निमंत्रण नसल्याच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोमणे मारले. “प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच राजकारण करु नयेउद्घाटनाचा कार्यक्रम राजकीय कार्यक्रम बनू नये किंवा एकाच पक्षभोवती फिरु नये” असं उद्धव ठाकरे म्हणालेराम मंदिराच्या उद्घाटनाचा आनंद असल्याच उद्धव ठाकरे म्हणालेया मुद्यासाठी माझे वडिल बाळासाहेब ठाकरे यांनी लढाई दिल्याचा त्यांनी उल्लेख केला.

ते प्रभू रामाचा अपमान करतायत

एएनआयशी बोलताना आचार्य सत्येंद्र दास यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदारप्रवक्ते संजय राऊत यांचा सुद्धा चांगलाच समाचार घेतला. “संजय राऊत यांना इतका त्रास होतोयकी ते शब्दातही व्यक्त करुन शकत नाहीएकवेळ ते प्रभू रामाच्या नावावर निवडणूक लढवायचेज्यांचा रामावर विश्वास आहेते आज सत्तेत आहेतते कशाबद्दल बोलतायतते प्रभू रामाचा अपमान करतायत” अशा शब्दात आचार्य सत्येंद्र दास यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला.

0
1989 views