logo

कोरेभीमाभीमा,तालुका शिरूर, जिल्हा पुणे महाराष्ट्र,येथून दत्त जयंती निमित्त नारायणपुर पर्यंत पायी पालखी सोहळा....

प्रतिनिधी श्री वैभव पवार
कोरेभीमा येथून दत्त जयंती निमित्त नारायणपुर पर्यंत पायी पालखी सोहळा....
समस्त कोरेगाव भीमा नागरिकांच्या वतीने कोरेगाव भीमा ते पुरंदर तालुक्यातील नारायणपूर पर्यंत श्रीगुरु देवदत्त जयंती सोहळा निमित्त पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान नुकतेच कोरेगाव भीमा गावची नगर प्रदिक्षणा करून झाले. सदर पालखी सोहळ्यात बहुसंख्येने बंधु - भगिनी नागरिक सहभागी झाले,यात श्री. बाळासाहेब फडतरे, श्री. केशवनाना फडतरे ग्रा. पं सदस्य,नितीन गव्हाणे मा. ग्रा. सदस्य,फडतरे- सवास्से कुटुंबीय सहभागी झाले.तसेच दिनांक 26/12/2023 मंगळवार रोजी
श्रीगुरुदेवदत्त महाराज यांच्या मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा श्रीनिवास कर्डेकरगुरुजी यांचे हस्ते होणार आहे.

0
0 views