
खासदार सुप्रिया सुळे व इतर १४० खासदारांना निलंबित केल्या प्रकरणी बारामती मध्ये महाविकासाआघाडी तर्फे निषेध व्यक्त!
हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सदनातील एकूण १४० हुन अधिक खासदार निलंबित केले प्रकरणी बारामती शहर येथिल भिगवण चौकामध्ये इंडिया/महा विकास आघाडी यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. विरोधी पक्षातील खासदारांचे निलंबन केले प्रकरणी निषेध व्यक्त करण्याचे निवेदन नायब तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) अध्यक्ष ऍड. एस एन जगताप, शहराध्यक्ष संदीप गुजर, महिला तालुकाध्यक्षा वनिता बनकर , युवती तालुका अध्यक्ष प्रियांका शेंडकर , शिवसेना जिल्हा प्रमुख ऍड राजेंद्र काळे, काँग्रेस चे आकाश मोरे, ऍड सुभाष ढोले, ऍड राजेंद्र काटे देशमुख,विश्वास मांढरे, राजेंद्र निंबाळकर, राजेंद्र गलांडे,सौ आरती शेंडगे इत्यादी यांनी निवेदन वरती सही करत अधिकाऱ्यांकडे निवेदन सुपूर्त केले. रा वि कॉ चे तालुकाध्यक्ष सुरज आटोळे पाटील ,रा कॉ पा चे सोशल मीडिया पुणे जिल्हा अध्यक्ष पैगंबर शेख,रा कॉ पा चे सोशल मीडिया बारामती तालुका अध्यक्ष वैभव पवार,रा यु कॉ चे बारामती तालूका कार्याध्यक्ष गौरव जाधव आदी उपस्थित होते.