
मालेगाव शहर पोलीसांनी चोरीस गेलेली पिकअप गाडी ताब्यात घेतली
मालेगाव, दि.१५ डिसेंबर २०२३:
मालेगाव शहर पोलीसांनी चोरीस गेलेली पिकअप गाडी ताब्यात घेतली आहे. आयशानगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे यांना दि.१३ डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार आयशानगर पोलीस ठाणे हद्दीत नायरा पेट्रोलपंचाचे पाठीमागे कॅम्प पोलीस स्टेशन कडील गुन्हे क्रमांक २५६/२०२३ भादवि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली पिकअप गाडी विक्री करण्यासाठी एक अज्ञात इसम येत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
याबाबत पोलीस निरीक्षक अहिरे यांनी सहा. पोलीस निरीक्षक बोरसे, पोउपनिरी. राजेंद्र पगारे, पोहवा ६६८ / सोमनाथ. डी. मोरवाळ, पो. अंम./ ३०९४ अविनाश पी. आहिरे अशा पथकाला पाठवले. पथकाने बातमीप्रमाणे खात्री करणेसाठी नायरा पेट्रोलपंचाचे पाठीमागे जावुन बातमीप्रमाणे खात्री केली असता एक पिकअप गाडी उभी दिसली. तिचे जवळ उभा असलेला इसम पोलीसांची येण्याची चाहुल लागताच तेथुन वाहन सोडुन पळुन गेला.
पथकाने सदर पिकअप वाहन ताब्यात घेवुन तपासणी केली असता सदर पिकअप वाहनावा क. एम.एच.२० सी.टी.६१५४ असा असल्याची खात्री झाल्याने व सदरचे वाहन हे कॅम्प पोलीस स्टेशन कडील गुन्हे क्रमांक २५६/२०२३ भादवि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली पिकअप गाडी हिच असल्याची खात्री झाल्याने सदर पिकअप पाडी हि पुढील कारवाई कामी कॅम्प पोलीस स्टेशन कडील अधिकारी/अंमलदार यांचे ताब्यात देण्यात आलेली आहे.
सदर कारवाईसाठी या पथकाला पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले