महाळुंगे येथील इक्वीलाईफ प्रीमियर लीग 2023 मध्ये रॉयल संघ विजेता तसेच किंग संघ उपविजेता
महाळुंगे येथील इक्वीलाईफ होम सोसायटी अंतर्गत झालेल्या दोन दिवसीय क्रिकेट सामन्यात एकूण आठ संघ सहभागी झाले होते. अंतर्गत क्रिकेट सामन्यांचे हे पाचवे वर्षे होते. क्रिकेट सामने हे अतिशय रंगतदार पद्धतीने युट्युब या चॅनलवर लाईव्ह स्ट्रीमिंग च्या माध्यमातून ही सोसायटी मधील सदस्यांना उपलब्ध करण्यात आले होते काही सामने अतिशय रोमांचक झाले होते सेमी फायनल आणि फायनल मध्ये अतिशय उत्कृष्ट चार संघ सहभागी झाले होते फायनल मध्ये श्री अनिरुद्ध काळे यांची किंग्स तर श्री. ओंकार नागवेकर यांची रॉयल्स टीम यांच्यात अतिशय चुरशीच्या सामन्यात रॉयल संघाने प्रथम फलंदाजी करताना आठ शतकात 97 धावां चा डोंगर उभा केला, या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्स या संघाने 83 धावा केल्या त्यामुळे रॉयल हा संघ किंग्ज या संघावर 14 धावांनी विजयी झाला. आयोजकांच्या व ज्येष्ठ नागरिक श्री संजय हिरे सह पत्नी यांच्या हस्ते ही बक्षिस वितरण करण्यात आले.