logo

लोकलचे दरवाजे प्रवाशाकडून बंद



बदलापूर रेल्वे स्टेशनवर मंगळवारी सकाळी 7.51मिनिटांनी कर्जतहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टार्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या एका डब्याचे दोन्ही दिशेने दरवाजे आतील प्रवश्यानी बंद केले होते त्यामुळे बदलापूरमधील प्रवाशांची गैरसोय झाली व लोकल मार्गस्त होण्यासाठी उशीर झाला
या गाडीचे दरवाजे बंद असल्याने फलटावर गोंधळ उडाला प्रवाशी ओरडत असतानाही लोकलमधील प्रवाशी त्यास प्रतिसाथ देत नव्हते त्यामुळे बदलापूरच्या प्रवाशांचा संताप वाढू लागला या गोंधळामुळे लोकलला उशीर होत होता अखेर रेल्वे प्रशासनाने मध्यस्ती करत आतील प्रवाशांना दरवाजे उघडण्यास सांगितले त्यानंतर ही लोकल मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली

0
0 views