
राजमाता अहिल्यादेवी राज्यस्तरीय स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळा -२०२३
राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन वतीने दरवर्षी प्रमाणे राज्यस्तरीय स्त्रीशक्ती पुरस्कार २०२३ चे आयोजन दि ९ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन,अमरावती येथे करण्यात आले आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटन महामहिम रमेशजी बैस ( राज्यपाल, महाराष्ट्र राज्य ) यांचे हस्ते होणार असून विशेष अतिथी म्हणून मा ना अजितदादा पवार ( उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ) मा ना आदिती तटकरे ( महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य ) मा पद्मश्री डॉ विकास महात्मे ( माजी खासदार राज्यसभा ) उपस्थित राहणार आहेत.
राजमाता अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कारासाठी कर्तृत्वान महिला म्हणून प्रशासकीय सेवेतून IAS अधिकारी मा.विनिता सिंगल ( मुंबई ) कलाक्षेत्रातून गायिका मा. वैशाली माडे ( मुंबई ) उद्योग क्षेत्रातून मा. स्नेहल लोंढे ( सांगली ) क्रीडा क्षेत्रातून मा. रक्षा पुणेकर ( बारामती ) आणि महिला शेतकरी म्हणून मा. ज्योती देशमुख ( अकोला ) यांची निवड करण्यात आल्याची माहिती राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन चे अध्यक्ष श्री संतोषभाऊ महात्मे यांनी पत्रकार परिषदेत दिली.