
*रायपूर पो स्टे कडून आनंदयात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी चे प्रकाशन व वितरण*
सादिक शाह रायपूर.
दी 6 डिसे.आज रोजी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी बंधू-भगिनींना कृतज्ञ पूर्वक समर्पित करण्यात आलेली अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जयंत नाईकनवरे लिखित आनंदी यात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी चे वितरण रायपूर येथील जिजाऊ ज्ञान मंदिर महाविद्यालय येथे एका मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमांत रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत पो स्ते कर्मचारी वर्ग तसेच महाविद्यालयातील संस्थापक श्री बाबासाहेब शेळके, शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत झाले. या वाचनीय डायरीत विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईक नवरे यांनी आपल्या संघर्षमय जीवन कार्य, बालपण, शिक्षण ,नोकरी, प्रशिक्षण कालावधी, तसेच विविध ठिकाणी करण्यात आलेल्या नोकरी दरम्यान आलेले अनुभव तसेच परदेशात केलेले नोकरीचे अनुभव हे लेखणीच्या माध्यमातून त्यांनी स्वतः लिखित करून व्यक्त केले आहे. आपल्या आनंदयात्री या शीर्षकांमध्येच डायरीचा आशय व्यक्त होतो
पोलीस व पोलिसांप्रती आदर असणाऱ्यांना हे लिखाण नक्कीच आवडेल व जे पोलीस सेवेत नाहीत अशांना पोलीस जीवनाचे सर्व वेगवेगळे पैलू वाचनातून दिसतील तसेच विद्यार्थी याना सदर डायरी चे वाचन अभ्यासात प्रोत्साहन देईल असे मत ठाणेदार राजपूत यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी सदर मार्गदर्शन शिबिर मध्ये उपस्थित विद्यार्थी विद्यार्थीनी यांना सायबर गुन्हे, महीला विषयक गुन्हे इतर कायद्या बाबत मार्गदर्शन केले तसेच इतर उपस्थित मान्यवर यांनी देखील विविध विषयांवर मार्गदर्शन केले ..