
युनिटी रियलिटीज कंपनी कर्मचाऱ्यांनी लूटला क्रिकेटचा आंनद सीझन २ क्रिकेट सामन्यांत युनिटी रियलिटीज कंपनीचा जल्लोष
*नागपूर,ता.४
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात गरीब, सामान्य कुटुंबातील लोकांच्या भविष्यातील स्वप्नातील आशीयाना व रोजगार उपलब्ध करून देणारी युनिटी रिलीटीज कंपनीने हिवाळी गुलाबी थंडीची चाहूल लागताच कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्य व मनोरंजनासाठी क्रिकेट सामन्यांचे तीन दिवसीय आयोजन जरीपटका मैदान, नागपूर येथे आयोजित केले.
युनिटी रियलीटीज कंपनीचे संचालक धम्मदीप खोब्रागडे व सह संचालक रवी वर्मा हे नागपूर जिल्हया्तील काना- कोपऱ्यात राहणारे सामान्य कुटुंबातील लोकांच्या भविष्याच्या सतत विचार करणारे कर्मचाऱ्यांना धावपळीच्या जीवनात उत्तम स्वास्थ्य, चेहऱ्यावर काॅन्फीडन्स सतत राहावे. या करीता अशा कंपनीच्या वतीने अनेक उपक्रम राबवितात. २०२२ मध्ये सीझन १ सामना घेण्यात आला होता तर २०२३ या वर्षात सीझन २ सामना नियम, टार्गेट पूर्ण करणारे कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात आला होता. याकरिता क्रिकेट सामन्यांची कार्यशाळा दोन आठवडे घेतल्यानंतर तीन दिवसीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात टाॅप लीडरचा मार्गदर्शनात पुरूष आणि महिला वर्गाची १२ टीम बनवण्यात आले होते.
जरीपटका, नागपूर मैदानावर सोमवार (दि.२७) नोव्हेंबर रोजी कंपनीचे संचालक मा.धम्मदीप खोब्रागडे व सह संचालक मा.रवी वर्मा तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन व प्रथम नाने फेकून क्रिकेट सामन्यांची सुरूवात करण्यात आली.
क्रिकेट सामन्यांत महिला वर्गानी चौफेर फटकेबाजी करत उत्तम प्रदर्शन केल्याने सीझन २ मध्ये कंपनीचे संचालक व उपस्थित मान्यवरांनी भरभरून प्रतिसाद देत कौतुक केले तर पुरुष टीमला विचार करायला भाग पाडले. पहिल्या दिवशी दि.२७ नोव्हेंबर रोजी सकाळी रिमझिम पाऊसात खेळाला सुरूवात झाल्याने तीन दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या आनंद प्रेक्षक वर्गानी मनसोक्त लुटला. या सामन्यांच्या दरम्यान आतीशबाजी, संगीतमय साऊंड आणि क्रिकेट सामन्यांत उपस्थित मान्यवर, प्रेक्षक आणि कर्मचाऱ्यांकरिता नास्ता, चहा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
अंतिम सामन्यात पुरुष आणि महिला विजयी टीमला युनिटी रियलीटीज कंपनीच्या वतीने विजयी कप, मेडल आदी पारितोषिके कंपनीचे संचालक धमद्दीप खोब्रागडे व रवी वर्मा यांच्या हस्ते
देण्यात आली. तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी क्रिकेट सामन्यांत भाग घेणाऱ्या टीमला युनिटी रियलीटीज कंपनीचे पदक देऊन सन्मानित करीत रिटायर पोलीस विभागातील अधिकारी मा.खोब्रागडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने कंपनीचे व्यवस्थापक किशोर तांडेकर तसेच सह व्यवस्थापकीय विभागीय नंदू कठाने व शुभम पहाडे आदी मान्यवरांनी सहकार्य केले तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी क्रिकेट सामन्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.