logo

माणुसकीमुळे उजळली वंचितांची दिवाळी..!

*माणुसकीमुळे उजळली वंचितांची दिवाळी*

सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी लोकनियुक्त सरपंच सुरेश आप्पा व आमची टीम दुसखेडा आदिवासी वस्तीवर जाऊन त्यांचा सोबत दिवाळी साजरी केली लहान बालकांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनली आहे. त्यांचा घरात दिवाळीचा सण साजरा होत नाही. त्यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे. या हेतूने आमचा हा लहान उपक्रम.

दिनेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते.

114
1075 views