logo

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींचा डाव पोलिसांनी उधळला

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींचा डाव पोलिसांनी उधळला

चोपडा शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

चोपडा प्रतिनिधी

तालुक्यातील निमगाव येथुन एका व्यक्तीचा भ्रमणध्वनीवरुन पोलीस हवालदार संतोष पारधी यांना फोन आला की चोपडा ते धरणगांव रोडवर तापी सुतगिरणीच्या पुढे असलेल्या वळणावर दिनांक 22/11/2023 रोजी सकाळी 4.30 ते 6.30 वा रेलच्या मारोती जवळ एक पिकअप मध्ये आठ ते दहा जण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने उभे आहेत.सदरची माहिती पोलिस हवलदार संतोष पारधी यांनी नाईट पेट्रोलिंग करणारे कर्मचारी सपोनि अजित सावळे पोह ज्ञानेश्वर जवागे व पोनि के के पाटील व घनश्याम तांबे यांना कळविले सदर बातमीची खाञी करण्यासाठी घटनास्थळी नाईट पेट्रोलिंगचे कर्मचारी पोहचले असता त्या ठिकाणाहून सर्व आरोपी फरार झालेले होते सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी नाईट पेट्रोलिंगचे कर्मचारी कडून शर्यतीचे प्रयत्न सुरू होते निमगाव शिवार,वेले शिवार,चहार्डी शिवार यात सकाळी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत सात आरोपी यांना पकडण्यात पोलीस कर्मचाऱ्यांना यश आले व त्यात दोन मुलं अज्ञान असून व बाकी तीन आरोपीचा शोध सुरु आहे.तर आरोपीचे नावे असे की दादला सिराम नरगावे वय 20 रा किरचली ता सेधंवा जि बडवाणी,सियाराम बेलोरसिंग चौहाण वय 23 रा झेंडीखोद्रो ता सेधंवा जि बडवाणी,जगदीश दमडीया नरगावे वय 24 रा किरचलो ता सेधंवा जि बडवाणी,ईकेश रामलाल सोलंकी वय 19 रा कुमठाणा ता सेधंवा जि बडवाणी,अर्जुन बलीराम आर्य वय 19 रा झेडीखोद्री ता सेधंवा जि बडवाणी व दोन जण अल्पवयिन असुन त्यांचे इतर दोन ते तीन साथीदार हे दरोडा,टाकण्याच्या उद्देशाने त्यांचे ताब्यात दरोडा,करण्याचे साहित्यासह तसेच त्यांचे ताब्यातील महिद्रा पिकअप वाहन क्रंमाक एम पी ०९ जी सी ५०६१ त्यामध्ये महिंद्रा कपंनीचे जनरेटर मशिन,लोखंडी रॉड,लोखंडी गज,मिरची पुड,लोखंडी पक्कड,लोखंडी पाने,एक प्लॅस्टीक मुठ असलेला चाकु,लाल रंगाची प्लॅस्टीक मुठ असलेली धारदार लोखंडी करवत व ५०,०००० रुपये किमंतीचे जियो टॉवरला जोडलेले महिंद्रा कपंनीचे जनरेटर मशिन,३००००० रुपये किमतीची महिद्रा पिकअप वाहन अशांसह मिळून आले असुन पोहेकाॕ दिपक विसावे यांच्या फिर्यादीवरुन चोपडा शहर पोलिस स्टेशनला भादंवि कलम ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोनि के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि घनश्याम तांबे हे करित आहे.

3
988 views