logo

हिंगोली लवकरच होणार श्री जरांगे पाटील यांची सभा

*जय जिजाऊ,जय शिवराय*🚩🚩
आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात मराठा समाजाची बैठक पार पडली सदरील बैठकीमध्ये मराठा योद्धा मनोज जी जरांगे यांची हिंगोली जिल्ह्यांमध्ये सभा होणार आहे त्या सभेचे स्थळ निश्चितीसाठी नियोजित 6 जागेपैकी असंख्य मराठ्यांनी डिग्रस क-हाळे फाटा येथील जागा निश्चित करण्यात आली. सदरील जागेची पाहणी करून सर्वानुमते सभास्थळी गणपती मंदिरावर मीटिंग घेऊन नियोजन करण्यात आले. एक मताने जागा निश्चित करून परिसरातील मराठा बांधवांनी जागा साफ करण्यासाठी जे.सी.पी. लेवल ट्रॅक्टर, पाणी टँकर, जाहिरातीसाठी वाहने, ट्रॅक्टर ट्रॉली सहित अशा विविध बाबीसाठी मराठा बांधवांनी स्वखर्चाने स्वतःची वाहने देण्यासाठी नाव नोंदणी केली आहे. मराठा बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा सभेसाठी मिळत आहे. सदरचा लढा हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे यासाठी जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांनी प्रथम आपली जात असते या उद्देशाने अहोरात्र मेहनत करून मा. मनोज जरांगे पाटील यांची सभा यशस्वी करावयाची आहे..... आता फक्त एकच मिशन मराठा आरक्षण.... *सभेसाठी पुढील नियोजनाची बैठक :- दि. 23/11/2023 रोज गुरुवार दुपारी एक वाजता सभा स्थळ दिग्रस फाटा गणपती मंदिर येथे होणार आहे* असंख्य मराठा बांधवांनी संपूर्ण जिल्ह्यातून यावे.
*विनीत :- सकल मराठा समाज जिल्हा हिंगोली.*

4
9634 views