logo

*गावोगावी भटकुन उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबासोबत साजरी केली भाजप युवा मोर्चाने दिवाळी*

सांगली; गावोगावी भटकणारे भिक्षा मागून आपले जीवन जगणाऱ्या कुटुंबांबरोबर मिरजेतील काही भाजप युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी आपली दिवाळी साजरी केली इतकेच नाही तर या कुटुंबाना टॉवेल टोपी आणि फराळ दिला आणि तो त्यांच्या बरोबर बसून खाल्ला देखील... होय मिरज शहराच्या बाहेरील भागात माळरानावर सध्या काही कुटुंबे बी=वस्ती करून आहेत काही डोंबारी समाजातील तर काही बहुरूपे आहेत तर कोणी अक्षरशः भिकारी आहेत पण मिरजेतील भाजप च्या युवा मोर्च्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेले सर्वसामान्य कुटुंबातील दिगंबर जाधव यांनी मात्र हि गोष्ट मनावर घेत भाजप युवा मोर्चा राज्य सचिव सागर वनखंडे यांच्या कडे या कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करण्याचा मनोदय व्यक्त केला तांबडतोक एक क्षणाचाही विलंब न करता सागर नी वरिष्ठ नेत्यांशी या संदर्भात चर्चा केली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 'एक दिवा वंचितांसाठी पालावरची दिवाळी' उपक्रमा अंतर्गत सचिव सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांनी या वस्तीवर आपल्या कार्यकर्त्यांसह समक्ष भेट दिली आणि या वस्त्यांवर असलेला अंधार त्यांनी दिवे लावून आणि फराळ आणि महिलांसाठी साड्या आणि पुरुषांना टॉवेल टोपीचे वाटप करून थोडे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला.
सध्या दिवाळी निमित्त सर्वत्र खरेदी चा उत्साह ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे सर्वत्र दिवाळीनिमित्त झालेल्या रोषणाई चा झगमगाट असताना मात्र गावोगावी भटकून उदरनिर्वाह करणाऱ्या विविध समाजातील आपल्या बांधवांना झोपड्या मध्ये मात्र अंधार आहे 'एक दिवा वांचीताच्यासाठी पालावरची दिवाळी' या उपक्रमाचे आयोजन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गर्शनाखाली सध्या राज्यभर सर्वत्र राबवले जात आहे. या अनुषंगाने दिवाळी फराळाचा आनंद या भटक्या समाज बांधवांना मिळावा यासाठी भाजप युवा मोर्चा सांगली जिल्हा शहर विभागा तर्फे तासगाव फाटा येथे अशा पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली याठिकाणी सोलापूर आणि धाराशिव येथून भटकंती करत आलेल्या डवरी गोसावी, नागपंथ आणि बहुरूपी बांधव आपल्या कुटुंबा सोबत पाल मारून राहिले आहेत या पाला मध्ये भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी दिवे लाऊन फराळ आणि भाऊबीज निमित्त साड्या वाटप केले या उपक्रमाने भटक्या बांधवांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आज दिवाळी सणाचा आनंद पाहिला मिळाला भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन प्रमुख मकरंद देशपांडे, अनु जाती मोर्चा चे प्रदेश सचिव प्रा मोहन वनखंडे, नगरसेवक गणेश माळी, विक्रम पाटील, बाबासाहेब आळेकर, संदीप कुकडे,प्रकाश पाटील, अनिल हारगे विकास मोरे, विशाल सागरे,महेश फोंडे, अभिरूप कांबळे हे उपस्थित होते.
*सुधीर गोखले सांगली प्रतिनिधी*

7
109 views
  
1 shares