logo

रिपब्लिकन युवा सेना अमरावती जिल्हा अध्यक्ष गोपाल भाऊ ढेकेकर यांच्या कामाला यश

*यशोदा बायपास रोड,संजय गांधी नगर चौक येथील स्थानिक रहिवासी यांनी सदर नाली ब्लोकेज ची अनेकदा लेखी तक्रार केली परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा अमरावती टाळाटाळ करीत असल्याचे त्यांनी सांगितले त्यानुसार रिपब्लिकन युवा सेना अमरावती जिल्हा अध्यक्ष गोपाल भाऊ ढेकेकर,रामेश्वर रामटेके व राहुलभाऊ शींगोले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मा.चंद्रकांत मेहत्रे साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी या सदर नाली ब्लोलेज चे काम होण्याबद्दल चर्चा करण्यात आली व साहेबांनी त्या निवेदनाची प्रत मागितली आणि लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.आणि बुधवार दी.8/11/2023 रोजी या कामाला सुरुवात झाली आहे.

5
3359 views