logo

दिवाळीच्या पूर्वसंध्येला भूषण प्रतिष्ठान मार्फत फराळ वाटप सर्वसामान्यांच्या घरात सुद्धा होणार आनंदाची दिवाळी; भूषण प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

सर्वसामान्यांच्या घरातही दिवाळी आनंददायी होण्यासाठी भूषण प्रतिष्ठान, दादर(मुंबई) यांच्या वतीने मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकण परिसरामध्ये हजारो कुटुंबीयांना दिवाळीचे फराळ देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज पालघर मधील वावेघर जवळील परिसरातील गावांमध्ये सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांच्या स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले.

दिवाळीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक कुटुंब ऐपतीप्रमाणे दिवाळीचा आनंद साजरा करतात. पण गोरगरिबांना यापासून वंचित राहावे लागते. गोरगरिबांना किमान फराळ मिळावा म्हणून भूषण प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतला आहे, असे प्रतिष्ठानचे सदस्य प्रसाद मागडे यांनी सांगितले. तर सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण केल्यानंतर मिळणारा आनंद हा चिरकाल टिकणारा असून आपल्याला संकटकाळी मदत करणारा असतो, असे प्रतिपादन ध्यान तज्ञ व समुपदेशक डॉ.दिपेश पष्टे यांनी यावेळी केले.

विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत यावे म्हणून त्यांना सुद्धा दिवाळीचे फराळ देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, भूषण फाउंडेशन चे सदस्य प्रसाद मागाडे, रवींद्र निर्भवणे, प्रकाश पवार, रमेश माने व सलमान शेख व परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते व स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी केले होते.

11
2039 views
  
1 shares