logo

भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी वाढदिवसानिमित्ताने जोपासली सामाजिक बांधिलकी

भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी वाढदिवसानिमित्ताने जोपासली सामाजिक बांधिलकी
-----------------------------
कुडूस: दि. १ भाजपचे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या ( ता.३१ आक्टोबर ) रोजी वाढदिवसानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत चिंचघर गाववासियांना १५० खुर्च्यांच्या संचाचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण केले.पाटील यांनी वकृत्व, दातृत्व व नेतृत्व यांची योग्य सांगड घालत अनेक विकास केली आहेत.
मंगेश पाटील हे वाडा पंचायत समितीचे माजी उपसभापती असून आपल्या गावची धुरा सांभाळत असतांना सुसज्ज ग्रामसंसद भवन, व्यायाम शाळा, भव्य प्रवेशद्वार, चिंचघर सेवा सहकारी सोसायटीचे अद्ययावत कार्यालय आदी विकास कामे त्यांनी केली आहेत. तसेच पक्षातील उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांच्यावर पक्ष श्रेष्ठींनी अध्यक्ष पदाची धुरा पुन्हा सोपविली आहे.
चिंचघर गावात सुख - दु:खाच्या प्रसंगी ग्रामस्थांकडे येणा-या पाहुण्यांची होणारी गैरसोय लक्षात घेत मंगेश पाटील यांनी १५० खुर्च्यांच्या संचाचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करून या खुर्च्या सुखा-दुःखाच्या कार्यक्रम प्रसंगी विनामूल्य देण्यात येतील असे सांगीतले
यावेळी भाजपचे नेते बाबाजी काठोळे,तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, पोलीस निरीक्षक सुरेश कदम,चिंचघर सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष धनंजय पष्टे आदींच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या खुर्च्याचा संच चिंचघर गाववासियांना विनामूल्य देण्यात येतील असे मंगेश पाटील यांनी यावेळी सांगीतले.
त्यांच्या सेवा भावी कार्याचा गौरव करून मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी हितचिंतक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5
1758 views