logo

आ.नितिन देशमुख यांच्या समक्ष उपोषण कर्ते गजानन हरणे यांच्याशी वार्तालाप. गजानन हरणे यांची वैद्यकीय तपासणी केली असता शुगर लेवल कमी

शकील खान/अकोला:- मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गजानन हरणे यांच्या अकोला येथील अन्नत्याग सत्याग्रहाच्या दुसऱ्या दिवशी आ.रणधीर सावरकर आ.नितिन देशमुख, माजी मंत्री दशरथ भांडे,जि.प.अध्यक्षा संगिता अढाऊ, युवक धनगर समाजाचे अध्यक्ष विशाल दिवनाले, सह्याद्री मराठा मकरंद पाटोळे, जिजाऊ ब्रिगेड चे इंदूताई देशमुख, जिल्हाध्यक्ष रेणू गावंडे, कार्याध्यक्ष मृदुला गावंडे,सिमा तायडे, प्रतिभा मते, सुरेखा राऊत, मराठा महासंघाचे राष्ट्रीय सदस्य दिलीप जगताप शेतकरी जागरमंचचे प्रशांत गावंडे काँग्रेस राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी शिवसेना तसेच मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड अश्या विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी आज उपोषण मंडपाला भेट देऊन वार्तालाप केला. आमदार रणधीर सावरकर यांच्या समक्ष उपोषण कर्ते गजानन हरणे यांच्या पत्नी सौ युगा यांनी आपली गाऱ्हाणी व समस्या मांडल्या आणि आरक्षणामुळे झालेल्या नुकसानीचा पाढा वाचला व आपला संताप व्यक्त केला.आज दिवसभर सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते यांनी मंडपाला भेट देऊन घोषणा दिल्या यामुळे परिसर घोषणांनी परिसर निनादून गेला होता. सकाळी गजानन हरणे यांची वैद्यकीय तपासणी केली असता शुगर लेवल कमी झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

18
3990 views
  
1 shares