कोगनोळी येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी
कोगनोळी, ता. 29 : येथील समस्त नाईक, बेरड समाज यांच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.
शिवाजी नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
माजी तालुका पंचायत सदस्य प्रितम पाटील यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी हर्षद बेरड यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेऊन जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्या मंगल नाईक, सचिन नाईक, बाळासो नाईक, अक्षय नाईक, बाबू बेरड, अमित बेरड, अक्षय बेरड यांच्यासह अन्य समाज बांधव, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.