logo

मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून हजारो शिवसैनिक ९ एप्रिल रोजी अयोध्या नगरीत जाऊन

मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून हजारो शिवसैनिक ९ एप्रिल रोजी अयोध्या नगरीत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. हजारो शिवसैनिकांना घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला ठाणे स्थानकात मुख्यमंत्री महोदयांनी भगवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी ठाणे स्थानकाचा संपूर्ण परिसर जय श्री राम, हर घर में बस एक ही नाम, जय श्रीराम जय श्रीराम, गर्व से कहो हम हिंदू हैं या घोषणांनी दुमदुमून गेला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 'गर्व से कहो हम हिंदू हैं ' ही ऐतिहासिक घोषणा दिली होती. बाळासाहेबांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेत मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आल्यानंतर प्रभु श्री रामाचे दर्शन घेण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सोडला होता. त्यानुसार अयोध्या दौऱ्याला जाण्यासाठी हजारो शिवसैनिक आज ठाणे स्थानकातून रवाना झाले. त्यांच्या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत मुख्यमंत्री महोदयांनी शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या. मीही यावेळी शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या. अयोध्येच्या दिशेने निघालेल्या या सर्व शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचा हा पहिलाच दौरा आहे. ठाणे स्थानकातून ज्याप्रमाणे शिवसैनिकांची एक ट्रेन रवाना झाली, तसेच कल्याण, डोंबिवली, नाशिक संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येकडे रवाना होत आहेत. हे सर्व शिवसैनिक हीच खरी शिवसेना आहे. अयोध्येला निघालेले शिवसैनिक हे खऱ्या अर्थाने तळागातील शिवसैनिक असल्याचे मत यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. तसेच या निमित्ताने प्रत्येक शिवसैनिकास प्रभू श्रीरामाचे दर्शन होणार आहे. याबरोबरच प्रत्येक शिवसैनिकाला अयोध्या येथे तयार होणारे प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माणही याचि देही याचि डोळा पाहता येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

या प्रसंगी विविध शहरप्रमुख, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

8
2315 views