logo

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया 'आरोग्यविषयक वैश्विक सुविधा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवणे'

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया 'आरोग्यविषयक वैश्विक सुविधा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवणे' या दोन दिवसीय जागतिक परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार


प्रभावशाली ठरू शकणारे परिणाम प्रत्यक्षात दाखवू शकतील अशा कृती आराखड्याच्या बाबतीत जागतिक एकमत तयार करण्याचे या जागतिक परिषदेचे उद्दिष्ट


भारताकडे सध्या असलेले जी-20 समुहाचे अध्यक्षपद आणि समुहाच्या या आधीच्या अध्यक्ष देशांच्या ठोस कृती आणि वचनबद्धतेने उपलब्ध करून दिलेली संधी साधत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियायी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने 20 आणि 21 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली इथे डिजिटल आरोग्य या विषयावरच्या 'आरोग्यविषयक वैश्विक सुविधा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवणे' या दोन दिवसीय जागतिक परिषदेचे आयोजन केले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया हे या जागतिक परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल, जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियायी क्षेत्रीय कार्यालयाचे, संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह, जागतिक आरोग्य संघटनेच्या /मुख्यालयाच्या डिजिटल हेल्थ अँड इनोव्हेशनचे संचालक प्राध्यापक एलेन लॅब्रिक, जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियायी क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य व्यवस्था विभागाचे संचालक मनोज झालानी हे देखील या परिषदेला उपस्थीत असणार आहेत.

या परिषदेच्या निमित्ताने जागतिक नेते, आरोग्यविषक विकास क्षेत्रातले प्रमुख भागीदार, आरोग्यविषयक धोरणकर्ते, डिजिटल आरोग्यविषयक क्षेत्रातल्या कल्पक आणि प्रभावशाली व्यक्ती, या क्षेत्रातील शिक्षणतज्ञ आणि इतर भागधारक एकत्र येणार आहेत. केवळ धोरण आखणीच्या पलिकडे जात या समुहाच्या सदस्य देशांमध्ये तळागाळापर्यंत प्रभावशाली ठरू शकणारे परिणाम प्रत्यक्षात दाखवू शकतील अशा कृती आराखड्याकड्याच्या बाबतीत जागतिक एकमत तयार करण्याच्या दिशेने लक्ष वळवणे, आणि त्यासाठी डिजिटल आरोग्य क्षेत्रात विविध प्रकारच्या अभिनव उपाययोजना करत, वैश्विक आरोग्यविषक सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रगती साधणे हे या जागतिक परिषदेचे उद्दीष्ट आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांवर भर असलेल्या लवचिक आरोग्य व्यवस्थेच्या निर्मितीचा पाया रचण्यासाठी, परस्परांशी जोडलेले डिजिटल आरोग्यविषयक उपक्रम आणि कृतींच्या अंमलबजावणीला गती देण्याचे काम या जागतिक परिषदेच्या माध्यमातून केले जाणार आहे. डिजीटल आरोग्यविषयक उपाययोजना पुरवताना त्या नैतिक, सुरक्षित, विश्वासार्ह, समन्यायी आणि शाश्वततेच्या मार्गाने पुरवल्या जातील यादृष्टीने आवश्यक क्षमतांना समोर आणण्यावरही या परिषदेत भर दिला जाणार आहे. पारदर्शकता, सुलभता, व्याप्ती, पुनरावृत्ती, परस्पर समन्वयाने व्यवस्थापन, गोपनीयता, सुरक्षा आणि विश्वासार्हता या तत्त्वांचे अनुसरण करत, डिजिटल तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक आणणे, असे तंत्रज्ञान विकसित करणे आणि ते परस्परांसोबत सामायिक करण्याचे मार्ग शोधण्यावर या परिषदेत भर दिला जाणार आहे. यामुळे डिजीटल आरोग्यविषयक व्यवस्था मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहचवण्यासाठी आवश्यक धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान निर्मात्यांची व्यवस्था उभारणे शक्य होणार आहे.

या जागतिक परिषदेत खाली दिलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने एकूण पाच सत्रांचे आयोजन केले आहे.

1. डिजिटल आरोग्य - आरोग्यविषयक वैश्विक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काळाची गरज

2. डिजिटल आरोग्यविषयक क्षेत्राची व्याप्ती - आवश्यक धोरणकर्ते

3. डिजिटल आरोग्यविषयक क्षेत्राची व्याप्ती - आवश्यक तंत्रज्ञाननिर्माते

4. आरोग्यविषयक वैश्विक सुविधा उपलब्ध करून देण्याकरता कशाप्रकारची अभिनवता हवी

5. आरोग्यविषयक वैश्विक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा जागतिक डिजिटील व्यापारी माल

या परिषदेत एक मंत्रीस्तरीय सत्रही होणार आहे. या सत्रात समुह चर्चेसोबतच डिजिटल आरोग्य व्यवस्थेकडे वळताना समोर असलेली आव्हाने, या क्षेत्राती संधी आणि आजवरच्या महत्वाच्या यशोगाथा अशा बाबींवरही चर्चा केली जाणार आहे.

0
0 views
  
1 shares