logo

चंद्रकांत पाटील यांच्यावर कडक कारवाईची मागणी. परभणी: राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषा

चंद्रकांत पाटील यांच्यावर कडक कारवाईची मागणी.

परभणी: राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.तसेच त्यांच्यावर शाइफेक करणाऱ्या मनोज गिरबीडे यांच्यावर सूडबुद्धीने व आकसाने दाखल करण्यात आलेले खोटे कलम 307 कमी करण्यात यावे.अशा मागणीचे निवेदन आज दिनांक १२डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उपजिल्हाधिकारी सेलू यांच्यामार्फत पाठवण्यात आले. यावेळी परभणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत,राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष गौतम साळवे,रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष बालकिशन साळवे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुबोध काकडे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष पप्पू शिंदे,अशोक पाईकराव,विष्णू देवकाते,अमोल व्हावळे,अनिल पांडागळे,धम्मरत्न धापसे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

117
15074 views
  
1 shares