पुणे..दी.6 डीसेंबर...
ॲक्युप्रेशर व ॲक्युपंक्चर तज्ञ *श्री. मकरंद काशिनाथ गावडे यांना ए आय एम ए स्टार ॲक्युपंक्चर अवॉ
पुणे..दी.6 डीसेंबर...
ॲक्युप्रेशर व ॲक्युपंक्चर तज्ञ *श्री. मकरंद काशिनाथ गावडे यांना ए आय एम ए स्टार ॲक्युपंक्चर अवॉर्ड नी सन्मानित.*
छत्रपती संभाजी नगर येथे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे *राष्ट्रीय पातळीवरचा ॲक्युपंक्चर स्टार अवॉर्ड 2022* हा ठेवण्यात आला होता. या अवॉर्डला भारतातून अनेक राज्यातुन ॲक्युपंक्चरिस्ट आले होते. नुकतीच महाराष्ट्र ॲक्युपंक्चर कौन्सिलची स्थापना होऊन ॲक्युपंक्चर प्रचारक काही महाराष्ट्रमधील लोकांना व महाराष्ट्र बाहेर जे ॲक्युपंक्चरचा प्रचार प्रसार करतात अश्या लोकांना हा अवॉर्ड देण्यात येतो. या अवॉर्डला देशातील सर्वात भव्य ॲक्युपंक्चर अवॉर्ड मानले जाते. या कार्यक्रमला *केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. डॉ.श्री. भागवत कराड साहेब, जगप्रसिद्ध कायरो प्रँक्टर मा.डॉ.श्री. रजनीश कांत, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट मा.डॉ. नितीन राजे पाटील, प्रेसिडेंट डॉ. सतीश कराळे* यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होती. अश्या या भव्य कार्यक्रमात *मा. श्री. मकरंद काशिनाथ गावडे यांना ए आय एम ए स्टार ॲक्युपंक्चर अवॉर्ड* देण्यात आला. श्री मकरंद गावडे अनेक वर्षांपासून ॲक्युपंक्चर क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. *मानेचे दुखणे, पाटीचे दुखणे, मणक्याचे विकार, सायटिका, फ्रोजन शोल्डर, ऍसिडिटी, मुळव्याध, गुडघेदुखी, टाचदुखी अशा विविध व्याधी वरती देहूफाटा, आळंदी देवाची* येथे उत्तमरीत्या उपचार करत आहेत. या अवॉर्ड बद्दल सर्व ठिकाणावरून, मित्र परिवार कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. *संपर्क- राजयोग ॲक्युपंक्चर थेरेपी सेंटर, देहूफाटा, आळंदी देवाची, या ठीकाणी आहे.