logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

NEWS मुंबई लोकलमधील लेडी पाकिटमारने पोलिसांना केले हैराण; जेलमध्ये रवानगी होताच झाले धक्कादायक खुलासे. मुंबई : प्रवासाम

NEWS मुंबई लोकलमधील लेडी पाकिटमारने पोलिसांना केले हैराण; जेलमध्ये रवानगी होताच झाले धक्कादायक खुलासे.
मुंबई : प्रवासामध्ये रोजच चोरीच्या घटना घडत असतात. यामुळे प्रवास करताना सावध राहण्याचा सल्ला प्रवाशांना दिला जातो. पोलीस आणि वाहतूक विभाग अशा घटना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. मुंबईत चोरी (Theft)चे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. जीआरपीने ट्रेनमध्ये चोरी करणाऱ्या एका महिलेला अटक (Arrest) केली आहे. ही महिला लोकांच्या मौल्यवान दागिने (Jewellery) आणि वस्तू चोरून फरार होत असे. ट्रेनमधील प्रवाशांचे दागिने चोरणारी ही 28 वर्षीय आरोपी महिला मुंबईतील गुलबर्गा परिसरात राहते. जीआरपीने तिला अटक केली आहे.आरोपी महिलेकडून चोरीचे दागिने हस्तगत
यानंतर जीआरपी महिलेचा शोध घेत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून महिलेची ओळख पटली आणि त्यानंतर प्रवाशांचे दागिने चोरण्यात तिचा सहभाग असल्याचे आढळून आले. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 379 (चोरीची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. एवढेच नाही तर पोलिसांनी महिलेकडून चोरीचे दागिनेही जप्त केले आहेत.

146
18804 views

Comment