logo

#हाक मदतीची साथ मनसेच्या कार्यकर्त्यांची# दिनांक 16 जुन 2022 रोजी फोर्टीस हॉस्पिटल मध्ये एक वयोवृद्ध महिलेला पिताश्याचे

#हाक मदतीची साथ मनसेच्या कार्यकर्त्यांची#
दिनांक 16 जुन 2022 रोजी फोर्टीस हॉस्पिटल मध्ये एक वयोवृद्ध महिलेला पिताश्याचे ऑपरेशन आणि उपचार साठी दाखल केले होते. ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले आणि औषध उपचार दिल्यानंतर फोर्टीस हॉस्पिटल त्यांना ऑपरेशन आणि उपचाराचे बिल दिले ते त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. हे बिल आधी *4लाख 80हजार* होते पण ते हॉस्पीटल ने बिल वाढवून *9लाख* पर्यंत नेले.या वयोवृद्ध महिलेला कोणी नाही एक तरुण मुलगा होता पण काही दिवसांपूर्वी *हृदय विकाराच्या झटक्याने त्यास देवाज्ञा* झाली.
महिलेच्या नातेवाईकानी कसेबसे थोडे बिल भरले *परंतु पूर्ण बिल भरू न शकल्या* मुळे हॉस्पीटल, त्या महिलेला *डिस्चार्ज* देत नव्हते.
नातेवाईकांनी बराच प्रयत्न करून, काही *सामाजिक संस्थांकडून* आणि *राजकीय नेत्यांकडून* मदतीचा हात मागितला पण कोणीही त्यांना मदत करण्यासाठी *पुढाकार घेतला नाही.*
परिसरांमध्ये श्री रुपेश भोईर यांचे मदत कार्याचे काम हे सर्वांनाच माहीत आहे असे ऐकल्यानंतर एका नातेवाईकांनी मनसेचे शहर संघटक श्री रुपेश चंद्रकांत भोईर यांना मदतीची हाक मारली. वेळ रात्रीचे अकरा वाजून गेले होते.
रुपेश भोईर यांनी फोर्टीस हॉस्पिटल ला भेट देऊन मनसेच्या कार्यपद्धतीने प्रकरण मिटवले व बिल माफ करून त्यांना डिस्चार्ज मिळवून दिला. नंतर त्या वयोवृद्ध महिलेनी खुप खुप आभार मानून त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवून *श्री रुपेश भोईर* यांना असेच मदत कार्य पुढे करत राहण्यासाठी शुभ आशीर्वाद दिले आणि नातेवाईकांनी श्री रुपेश भोईर यांचे आभार मानले.
श्री रुपेश भोईर यांनी फोर्टिस हॉस्पिटलचे जे सहाय्यक आणि परिचारिका आणि अकाउंट डिपारमेंट मध्ये जे अधिकारी होते त्यांचे सर्वांचे आभार मानून सहकार्य करून बिल माफ करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद दिले.
मदतीच्या हाकेला साथ हीच आहे मनसेची कार्यप्रणाली* असे म्हणत
श्री रुपेश चंद्रकांत भोईर यांनी त्या वयोवृद्ध महिलेचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा निरोप घेतला.
आपला,
मा.श्री.रूपेश चंद्रकांत भोईर

66
14767 views
  
1 shares