logo

टिक टॉक बंदीसाठी अर्जुन प्रतिष्ठान संघटने मार्फत भारताचे पंतप्रधान यांना केलेल्या पत्रव्यवहाराला अखेरी यश.

Tik Tok अप्लिकेशन वर येणारे जातीवादक, धर्माविरुद्ध काही व्हिडिओ प्रसारीत होत होते. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होत होते. यासाठी अर्जुन प्रतिष्ठान संघटनेच्या वतीने सन्माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी आणि सन्माननीय मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांना ईमेल च्या माध्यमातून  भारतातून Tik Tok अप्लिकेशन वर बंदी यावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. अखेरी दि.२९ जून रोजी भारत सरकार कडून Tik Tok अप्लिकेशन पकडून चीन चे ५६ अप्लिकेशन  भारतातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्जुन प्रतिष्ठान संघटनेच्या वतीने ईमेल द्वारे केलेल्या पत्रव्यवहार मोहीमे मध्ये २०० च्या आसपास लोकांनी सहभाग नोंदवून भारतातून Tik Tok अप्लिकेशन वर बंदी यावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. याबाबत संघटनेचे संस्थापक श्री.निकम यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.

144
21503 views