पुणे .3 मे 2022 आळंदी देवाची
*क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 891व्या जयंती उत्सवा निमित्त शिवा
पुणे .3 मे 2022 आळंदी देवाची
*क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 891व्या जयंती उत्सवा निमित्त शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आळंदी शहर व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने संयुक्तपणे जयंती उत्सव साजरा करण्यात आली.*
क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 891व्या जयंती उत्सवा निमित्त तिथीप्रमाणे अक्षय तृतीया मंगळवार दिनांक 3 मे 2022 रोजी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आळंदी शहर व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने संयुक्तपणे धनगर समाज धर्मशाळा आळंदी देवाची येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी शिवा संघटनेचे आळंदी शहर अध्यक्ष सदाशिव साखरे यांनी सांगितले की बाराव्या शतकात वीरशैव लिंगायत धर्माचे विश्वगुरू क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांनी समता, समानता, बंधुता, विवेक, कायक, दासोह या तत्वांनी जाती-लिंग-वर्ण-वर्ग इ. भेदविरहित अनुभव मंटप (शिवनुभव मंटप म्हणजेच आत्ताची संसद) जगातील पहिल्या संसदेची निर्मिती केली व सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषांना तळहातावर शिवलिंग देवून दीक्षा दिली व गळ्यात शिवलिंग धारण करून ईश्वप्राप्तीसाठी भक्तीच्या, लोकशाहीच्या मार्गाने जगण्याचा मुलभूत अधिकार तसेच कायकवे कैलास, श्रम हाच ईश्वर हा मूलमंत्र महात्मा बसवेश्वरांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिला अशी माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी शिवा संघटनेचे अध्यक्ष सदाशिव साखरे, जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर, यशवंत संघर्ष सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णु कुऱ्हाडे, उपाध्यक्ष भागवत काटकर, शहर अध्यक्ष बाळासाहेब कवळासे, कामगार पथारी सुरक्षा दलाचे अध्यक्ष सोमनाथ साखरे, कार्याध्यक्ष नानासाहेब मोरे, शिवा संघटनेचे सचिव अभयानंद महाराज लोखंडे, संपर्क प्रमुख हवगीराव भुसारे, सोशल मीडिया अध्यक्ष ओमकार सगरे, संघटक शिवानंद कलशेट्टी, कैलासअप्पा चिंचोलकर, सहसंघटक त्रिंबक स्वामी, लखन स्वामी, आबासाहेब खैरनार, नागेश स्वामी, सिद्धेश्वर शेळगावे, पथारी सुरक्षा दलाचे शाखा अध्यक्ष गणेश मुंजाळ, उपाध्यक्ष निलेश ढोकणे, सचिव रमेश शेलार, तसेच आळंदी शहर व परिसरातील शिवा संघटना, आळंदी जनहित फाऊंडेशन, यशवंत संघर्ष सेना, यल्गार सेना, नेचर फाऊंडेशन, कामगार पथारी सुरक्षा दल तसेच सर्व राजकीय, सामाजिक, ओबीसी संघटना, सर्व समाज बांधव, वीरशैव लिंगायत समाज बांधव शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आळंदी शहर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
ब्युरो चिफ.जे.के.सोनवणे