logo

पिचर्डे. ता.भडगाव जि.जळगाव. *जेके 4545 मका ठरत आहे शेतकऱ्यांसाठी वरदान* दिनांक 6 मार्च रोजी विनोद हेमराज पाटील, रा.

पिचर्डे. ता.भडगाव जि.जळगाव.
*जेके 4545 मका ठरत आहे शेतकऱ्यांसाठी वरदान*

दिनांक 6 मार्च रोजी विनोद हेमराज पाटील, रा. पिचर्डे यांच्या शेतामध्ये जेके ४५४५ या मक्याचा प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात भडगाव तालुक्यातील विविध कृषी विक्रेते तसेच प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमास जेके कंपनीचे महाराष्ट्र राज्य विभागीय अधिकारी अशोक कुमार साहेब, जळगाव जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील चव्हाण साहेब, भडगाव तालुका प्रतिनिधी धनराज पाटील यांनी मका उत्पादन वाढीसाठीचे नियोजनाबद्दल मार्गदर्शन केले. जेके ४५४५ या प्रॉडक्ट बद्दल पिचर्डे गावचे शेतकरी स्वतः विनोद हेमराज पाटील यांनी विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल त्यांनी सांगितले.

जेके ४५४५ या प्रोडक्ट बद्दल अशी माहिती देण्यात आली की,
मोठे व वजनदार कणिस, टोकापर्यंत भरलेले कणसे, अळीचा प्रादुर्भाव नाही, सर्वात बारीक बीट्टी, कॅप्सुल व वजनदार दाणे व आकर्षक नारंगी रंग, आणि दुधाळ जनावरांसाठी
उत्कृष्ट चारा व तसेच भरपूर उत्पादन देणारे मक्का वाण अशा या उत्पादनाचे स्वरूप असल्याची माहिती देण्यात आली.

या शेतकऱ्यांनी व दुकानदारांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष शेतात पीक पाहून जेके 4545 मक्का बद्दल अतिशय समाधान व्यक्त केले आहे, तसेच अशा प्रकारचे प्रोडक्ट अजून पर्यंत पाहिले नसल्याचे सांगितले व जेके 4545 मक्का लय भारी वाण असल्याचे सांगितले व पुढच्या हंगामात जेके ४५४५ या मक्का ची लागवड तालुक्यात सर्वत्र करणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलण्यात येत आहे.
धनराज पाटील.पिचर्डे.ता.भडगाव जि.जळगाव

15
14794 views
  
1 shares