
महाराष्ट्र पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रात बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, तीन नाशिकचे तर एक स्थानिक विद्यार्थी
"म
महाराष्ट्र पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रात बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, तीन नाशिकचे तर एक स्थानिक विद्यार्थी
"महाराष्ट्र व गुजरात राज्यासह हजारो पर्यटक भेट देत असलेल्या समुद्र किनारी लाईफ गार्डच नाहीत. पर्यटकांकडून लाखो रुपये पर्यटन कर वसुल करणार्या केळवे ग्रामपंचायत कडून पर्यटकांच्या सुरक्षिततेकडे मात्र दुर्लक्ष"
महाराष्ट्र: दि.०३, पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस स्टेशन अंतर्गत माहिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व पालघर पासून काही अंतरावरिल पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या केळवे समुद्रात बुडून चार जणांचा मृत्यू झालाय. या मध्ये एका स्थानिक मुलाचा समावेश असून, इतर तीन विद्यार्थी नाशिक येथील ब्रह्मा वेली कॉलेज आहेत. नाशिक मधील या कॉलेजचे हे विद्यार्थी एका खाजगी क्लासेसचे विद्यार्थी आहेत. याच क्लासेस तर्फे ३९ विद्यार्थी सहलीसाठी आज केळवे बीच येथे होते. हे विद्यार्थी दुपारच्या वेळी समुद्र किनारी सहलीचा आनंद घेत असताना समुद्रात काही मुलं बुडत असल्याचं पाहून नाशिक येथून आलेल्या या मुलांपैकी काही मुलांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली आणी त्यापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एका विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आले आहे .
ओम विसपुते, कृष्णा शेलार, दीपक वडकाते या नाशिकच्या विद्यार्थांचा मुकेश नाकरे- १३ वर्ष या केळवे येथिल स्थानिक विद्यार्थाचा अश्या चार जणांचा समुद्रात बुडन दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी सातपाटी पोलीस स्टेशन आंतर्गत माहिम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास व कारवाई सुरु असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.
दरम्यान हजारो पर्यटक भेट देणाऱ्या व पर्यटन कराच्या रूपाने लाखो रुपये कमविणाऱ्या केळवे ग्रामपंचायतने व प्रशासनाने या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लाईफ गार्ड व इतर साधान सामग्रीची व्यवस्था केली असती तर वेळीच मदत मिळून यांचे प्राण वाचले असते.
आता तरी तात्काळ या उपाय योजाना केल्या जातात की नाही ते पहावे लागेल.