
ड्रग माफिया निलेश सुर्वे व हत्याऱ्या ड्रग अडीक्ट आरोपींवर कारवाईसाठी बोईसर पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा
"मागील
ड्रग माफिया निलेश सुर्वे व हत्याऱ्या ड्रग अडीक्ट आरोपींवर कारवाईसाठी बोईसर पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा
"मागील अनेक वर्षांपासून पालघर, बोईसर व वाणगाव रेल्वे परिसरात राजरोसपणे ड्रगची विक्री करून तुरुण पिढीला बरबाद करणार्या ड्रग पेडलर निलेश सुर्वेवर अमली पदार्थ विरोधी पथ व स्थानिक पोलीसांकडून कारवाई केंव्हा ? ड्रग अँडीक्ट तरुणांकडून रस्त्याने चालणार्या नागरिकांवर कोयत्याने हल्ला संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्याला घेराव" पोलीसांकडे वारंवार तक्रारी करून ही कारवाई का नाही ?
तारापूर: दि.२६, औद्योगिक वसाहतीसह अनेक शाळा कॉलेजेस व लाखोंच्या वरती लोकवस्ती असलेल्या बोईसरसह, पालघर परिसरात सहजपणे मिळणाऱ्या अमली पदार्थांची विकणाऱ्या तस्करांवर कारवाई व भविष्यात असे गंभीर गुन्हे घडू नयेत, तरुण पिढी व्यसानाधीन होऊन बरबाद होऊ होत आहे. मागील अनेक वर्षांपासून नीलेश सुर्वे हा व्यक्ती बोईसर पालघर व वाणगांव परिसरात राजरोसपणे ड्रग अमली पदार्थांची विक्री करित आहे. पोलीस मात्र या ड्रग पेडलरवरती कारवाई न करता त्याचे सेवन करणाऱ्या तरुणांवर नेहमीच कारवाई करताना दिसतात. याचा परिणाम आता स्पष्ट दिसू लागला असून दोन दिवसापूर्वीच बोईसरमध्ये अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणाने रस्त्यावरून चालत असलेल्या नागरिकांवर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात राणी-शिगाव मधील रहिवाशी असलेल्या एकाचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
या प्रकरणी आरोपी व ड्रग पेडलर सुर्वेवरती बोईसर पोलिसांनी कठोर कारवाई करावी यासाठी राणीशीगावच्या नागरिकांनी ७ किलो मीटर पायी चालत थेट बोईसर पोलीस स्टेशन वरती मोर्चा काढण्याला होता.
या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा तर बोईसरच्या परिसरामध्ये चरस, गांजा या सारखे ड्रग सहजपणे मिळत आहे. याची विक्री निलेश सुर्वे हा रेलवे स्टेशनचा आधार घेत करित असल्याचे जग जाहिर असताना ही त्याच्यावर अध्याप कोणतीच कारवाई केली गेली नाही व जात ही नाही यामुळे शकडो तरूण बरबाद होत आहेत.
परिसरामध्ये परप्रांतीय भाडेकरू मोठ्या प्रमाणात राहत आहेत यांची कायदेशीर माहिती पोलीस स्टेशनला चाळ मालक देत नाहीत. बेकायदेशीर अमली पदार्थ विकणाऱ्या गांजा चरस तस्करांना जेरबंद करा व कारवाईसाठी मयत बाळू मेढाच्या नातेवाईक व नागरिकांनी बोईसर पोलीस स्टेशन मध्ये मोर्चा काढत यामुळे महिलानी पोलीस स्टेशन वर मोर्चा काढत आपला निषेध नोंदवला आहे.
यापूर्वी ही एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा गावकर्यांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून निषेध नोंदवला होता.
निलेश सुर्वे नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन करून तरुण पिढीला ड्रगच्या नादी लावत असल्याचा आरोप नागरिक करित असून यासाठी सुर्वे कडून चक्क राजकीय नेत्यांच्या बॅनरचा वापरला केला जात असल्याने त्याच्या या गोरख धंद्याला राजकीय व प्रशासकीय पाठबळ असल्यानेच कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.
बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. के. एस. हेगाजे, बोईसर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी आंदोलनकारी लोकांना शांता राखण्यासाठी आव्हान करत कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदिश धोडी, युवा प्रतिष्ठन चे विक्रम धोडी, महेश जाधव, आनंद धोडी, गावातील नागरीक व मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.