
१० वी/१२ वी गुणवंत विद्यार्थी व MPSC तील यशवंतांचा सत्कार व विद्यार्थी-पालक प्रेरणा सोहळा २०२१ नुकताच ११/१२)२०२१ र
१० वी/१२ वी गुणवंत विद्यार्थी व MPSC तील यशवंतांचा सत्कार व विद्यार्थी-पालक प्रेरणा सोहळा २०२१ नुकताच ११/१२)२०२१ रोजी चाळीसगांव तालुक्यातील चिंचगव्हाण फाटा येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.श्री.उज्वलकुमार चव्हाण IRS, आयकर सहआयुक्त मुंबई, मा.श्री.दिपक पाटील तहसिलदार नाशिक, मा.श्री.कपिल पवार CAFO जळगांव महानगरपालिका, मा.श्री.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन IAS अमरावती, मा.श्री.केशव मगर CEO वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अँड अँग्रो प्रोसेसिंग लि.नाशिक, विषेश सत्कारार्थी MPSC मा.मानसीताई पाटील, उपजिल्हाधिकारी (राज्यसेवा २०२० मुलींमधून राज्यात प्रथम), मा.श्री.राहुल मोरे, तहसिलदार (राज्यसेवा २०२०), मा.श्री अभिषेक कासोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महाराष्ट्र टॉपर राज्यसेवा २०२०) आणि पंधरा शाळेतील १०वी व १२ वी चे प्रथम आलेले सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक सर्व शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.डॉ.सुनील धनगर यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अँड अँग्रो प्रोसेसिंग लि.नाशिक यांनी केले होते.