logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गगनगिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह 2026 साजरा होणार

अहिल्यानगर
संगमनेर
गुंजाळवाडी : परमपूज्य स्वामी श्री गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरीनाम सप्ताह 2026 दिनांक 08 जून ते 15 जून दरम्यान आपल्या पंचक्रोशीमध्ये साजरा होणार आहे. या तीन वर्षांत एकदाच येणाऱ्या सप्ताहात प्रत्येक दिवशी महान संतांचे दर्शन व मार्गदर्शन मिळणार आहे. दुपारी 11.00 ते 1.00 वाजता नामवंत व्यक्तींचे व्याख्यान, दुपारी 3.30 ते 5.30 वाजता महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन आणि सायंकाळी 7.00 ते 10.00 वाजता ह.भ.प. रामराव महाराज ढोक (नागपूरकर) यांच्या रामायण कथांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात सकाळी 7.00 ते रात्री 11.00 पर्यंत अन्नदान सुरु राहील, ज्यात दररोज किमान ५० हजार ते १ लाख लोकांना सेवा दिली जाईल. सात दिवस मुक्कामी सुमारे ५०० लोक असतील तसेच २००हून अधिक दुकाने व १७५ कृषी प्रदर्शन स्टॉल्स असतील. ज्ञानेश्वरी पारायण व हरिपाठ नियमित होणार आहे. हा कार्यक्रम गुंजाळवाडी गावाचा नव्हे तर संपूर्ण संगमनेर तालुक्याचा आहे ज्यात तालुक्यातील सर्व गावांचा सहभाग आहे. प्रत्येक गावाला त्यांच्या दिवस व वेळेनुसार विविध सेवा व नियोजन करण्याची जबाबदारी दिली आहे.

2
434 views

Comment